कोरोनानंतर चीनकडून जगाला आणखी एका रोगाची देण! जारी केला अलर्ट


बिजिंग – कोरोनाचे उगम स्थान असलेल्या चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण उत्तर चीनमधील एका शहरामध्ये आढळून आल्यानंतर तेथील आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. सध्या तरी या आजाराचे दोन रुग्ण आढळून आल्याचे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पण या आजाराचा प्राण्यांमधून मानवामध्ये सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात अशी आणखीन काही रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यानेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, ब्यूबॉनिक प्लेगवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नुरमध्ये तिसऱ्या स्तरावरील इशारा देण्यात आला आहे. बयन्नुरमधील एका रुग्णालयामध्ये ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जारी केलेला सतर्कतेचा इशारा हा २०२० च्या शेवटपर्यंत लागू राहणार आहे.

प्लेगचा संसर्ग होण्याची भिती सध्या शहरामध्ये आहे. जतनतेने स्वत:च्या सुरक्षेसाठी जागरुक राहणे गरजेचे आहे. स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती नागरिकांनी वाढवणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यासंदर्भातील काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देणे गरजेचे असल्याचे बयन्नुरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

१ जुलै रोजी सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तामध्ये पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतामध्ये ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रयोगशाळेतील चाचण्यानंतर या रुग्णांना झालेला संसर्ग हा ब्यूबानिक प्लेगचाचा असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्याचबरोबर संशोधकांनी चीनमध्ये या ब्यूबोनिक प्लेगबरोबरच पीग इन्फ्लूएन्जाचीही भिती व्यक्त केली आहे. पीग इन्फ्यूएन्जा हा आजार डुक्करांच्या माध्यमातून पसरु शकतो, असे चीनमधील अँगीकल्चरल युनिव्हर्सिटी म्हणजेच शेतीसंदर्भातील संशोधन करणाऱ्या विद्यापिठातील शासस्त्रज्ञ तसेच चीनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेप्रमाणेच इतर संस्थानी म्हटले आहे. जेनोटाइप ४ प्रकाराचा हा विषाणू आहे. म्हणजेच हा डुक्करांमध्ये अगदी विषाणू वेगाने पसतो. डुक्करांमधून त्याचा मानवालाही संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्लोबल टाइम्समधील वृत्तामध्ये म्हटले होते.

या विषाणूच्या संसर्गाचा वेग भविष्यात वाढण्याची भिती संसोधकांनी व्यक्त केली आहे. या विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच कोरोनाप्रमाणे याचा जगभरात संसर्ग होण्याची शक्यता टाळता येत नसल्याचे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. जी फोर प्रकारच्या या विषाणूचा संसर्ग कसा होत आहे यासंदर्भात अभ्यास करणे आणि डुक्करांसंदर्भातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चाचणी आणि वरचे वर तपासणी करण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

Leave a Comment