३२ देशांच्या शास्त्रज्ञांनी WHO ला इशारा; हवेच्या माध्यमातूनही होत आहे कोरोना संसर्ग


नवी दिल्ली – ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांच्या संशोधनात कोरोनाचा प्रसार हवेच्या माध्यमातून होत असल्याची भीती व्यक्त करत हवेतही कोरोना विषाणूचे छोटे छोटे कण जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो, असे समोर आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होतो यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) जारी केली होती. त्यानुसार हवेतून हा विषाणू पसरत नाही असा दावा करण्यात आला होता. त्यावेळी आरोग्य संघटनेने असे देखील स्पष्ट केले होते की, शिंक, खोकला, कफ आणि बोलण्याच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू हा पसरू शकतो.

यासंदर्भात न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत शास्त्रज्ञांनी एक सविस्तर पत्र लिहले असून हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. त्याचे सर्व पुरावेही आहेत. त्यानुसार कोरोनाच्या विषाणूचे छोटे-छोटे कण हवेत तरंगतात. लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास ते पुरेसे असल्यामुळे यावर पुन्हा एकदा संशोधन करण्याची विनंती करण्यात आली आहे. सायन्टिफिक जर्नलमध्ये पुढील आठवड्यात हे पत्र प्रकाशित होणार आहे. वृत्तसंस्था रॉयटरने हवेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेकडे प्रतिक्रिया मागवली आहे. पण यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

Leave a Comment