उद्या रिलीज होणार सुशांतच्या ‘दिल बेचारा’चा ट्रेलर


14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. त्याच्या या अशा अचानक एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पण इतके टोकाचे पाऊल सुशांतने का उचलले? हे अद्याप समोर आलेले नाही. त्यातच आपल्या लाडक्या अभिनेत्याला शेवटचे मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


याच दरम्यान नुकतेच एक ट्विट करत दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती संगीतकार ए.आर, रेहमान यांनी दिली आहे. ज्यामुळे उद्या सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांना दिल बेचारा या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे.

दरम्यान सुशांतच्या चाहत्यांकडून त्याचा दिल बेचारा हा शेवटचा चित्रपट थिएटरमध्येच रिलीज करावा अशी मागणी करण्यात येत होते. पण त्याच्या चाहत्यांची इच्छा अपूर्णच राहणार आहे. कारण दिल बेचारा हा चित्रपट निर्मात्यांनी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ जुलैला दिल बेचारा हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित होईल अशी माहिती हॉटस्टारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. पण, चाहत्यांनी निर्मात्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Comment