मोदी सरकारच्या अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच मिळणार मोफत धान्य


नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मागील आठवड्यात देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 80 कोटी लोकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्न धान्य मिळणार असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करताना तीन महिने मोफत धान्य मिळणार असल्याचे जाहीर केले होते. आता नोव्हेंबरपर्यंत हीच योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात मोदींनी केली. पण या योजनेचा लाभ आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणाऱ्या व्यक्तींनाच घेता येईल.

सरकार गरिबांना पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत नोव्हेंबरपर्यंत धान्याचा मोफत पुरवठा करणार आहे. पण त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. सरकारने आतापर्यंत आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक न केलेल्यांसाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारकडून गरिब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत पाच किलो गहू/तांदूळ आणि एक किलो चणा डाळ दिले जात आहेत. महिनाभरासाठी हे धान्य पुरवण्यात येत आहे. तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आता नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

आधार कार्ड आणि रेशन कार्ड पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेण्यासाठी लिंक करणे बंधनकारक आहे. सरकारने त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली मुदतही वाढवली आहे. पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना घेता यावा या दृष्टीने आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment