आमदार महेश लांडगेंना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज


पुणे : मागील महिन्याच्या 29 तारखेला पुण्यातील भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार तथा भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र आता आमदार महेश लांडगे यांना आदित्य बिर्ला रुग्णालयातून परिवारासह डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकीपोटी त्यांचा संपर्क मतदार संघातील लोकांशी आला होता. तसेच शहरात येणा-या प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी देखील त्यांचा संपर्क आला होता.


दरम्यान खुद्द महेश लांडगे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माझी व माझ्या परिवाराची प्रकृती स्टेबल असून आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या होम आयसोलेशन द्वारे डॉ.विनायक पाटील यांच्या अंडर संपूर्ण कुटुंब घरीच ट्रिटमेंट घेत आहोत. काळजी नसावी, 15-20 जुलै पर्यंत ट्रिटमेंट सुरु राहिल, अशी माहिती दिली.

Leave a Comment