इंस्टाग्रामच्या माध्यमातून कशाप्रकारे कराल कमाई


आजकाल विविध कारणांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येतो. यावर आपण आपली मते मांडू शकता किंवा तुमच्या कलेचे देखील प्रदर्शन घडवू शकता. पण हाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर बऱ्याच जणांसाठी कमाईचे साधन बनले आहे. यातील इंस्टाग्राम देखील महत्त्वाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम केवळ मत मांडण्यासाठीचे व्यासपीठ नसून यातून काही सेलिब्रिटींची भक्कम कमाई देखील होते. याबाबतची माहिती इंस्टाग्रामच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या रिच लिस्टवरून मिळते. इंस्टाग्रामच्या माध्यमातून कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची नावे या यादीमध्ये असतात.

दरम्यान इंस्टाग्रामवरील प्रमोशन एकदम नैसर्गिक वाटते. म्हणजे ज्या जाहिराती तुम्ही टीव्हीवर पाहता, तुम्हाला तेव्हा माहित असते की त्या जाहिराती आहेत. पण एखाद्या सेलिब्रिटीने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यास ती जाहिरात न वाटता केवळ एक सोशल मीडिया पोस्ट वाटते. त्याचप्रमाणे सेलिब्रिटी हे प्रोडक्ट वापरत आहेत, म्हणजे त्यामध्ये काहीतरी खास असणार, असे त्यांच्या फॉलोअर्सना देखील वाटते.

इंस्टाग्रामवर फक्त सेलिब्रिटी नाही तर सामान्य माणसे देखील पैसे कमावू शकतात. हे सर्वकाही तुमचे किती फॉलोअर्स आहेत यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर कोणाचे प्रमोशन करता येईल हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ही एक पूर्णपणे व्यावसायिक रणनिती आहे. उत्तम कंटेट, योग्य हॅशटॅग्स, चांगले फोटो किंवा व्हिडीओ या सर्व गोष्टी इंस्टावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी लक्षात घेणे आवश्यक आहे. इंस्टावर असणाऱ्या खास थीम्स, फिल्टर याचे देखील ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे.

Leave a Comment