गुगलने फेसबुक पासवर्ड चोरणाऱ्या २५ अ‍ॅप्सवर घातली बंदी


आपल्या प्ले स्टोअरवरुन गुगलने जवळपास २५ अ‍ॅप्स हटवले आहेत. वापरकर्त्यांचा फेसबुक लॉगइनचा तपशील हे अ‍ॅप्स चोरत असल्याची माहिती समोर आल्यामुळे गुगलकडून हे पाऊल उचलण्यात आले. याबद्दल गुगलला एविना नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मने सतर्क केल्यानंतर यावर तात्काळ अंमलबजावणी करत गुगलने संबंधित अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहे.

प्ले स्टोरवरून हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये एक मालवेअर असतो. वापरकर्त्याच्या फेसबुक लॉगइन डिटेल्सची नोंद त्या माध्यमातून ठेवली जाते. हे अ‍ॅप्स सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. जवळपास २० लाख लोकांनी हे २५ अ‍ॅप्स डाऊनलोड केले आहेत. खाली दिलेल्या यादीपैकी कोणतेही अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असेल, तर ते तात्काळ डिलीट करा.

या अॅप्सवर गुगलने घातली बंदी
1. सुपर वॉलपेपर्स फ्लॅशलाइट्स
2. पेडेनटेफ
3. वॉलपेपर लेवल
4. कॉन्टूर लेवल वॉलपेपर
5. आयप्लेयर अँड आयवॉलपेपर
6. व्हिडियोमेकर
7. कलर वॉलपेपर्स
8. पेडोमीटर
9. पावरफुल फ्लॅशलाइट
10. सुपर ब्राइट फ्लॅशलाइट
11. सुपर फ्लॅशलाइट
12. सॉलिटायर गेम
13. एक्युरेट स्कॅनिंग ऑफ क्यूआर कोड
14. क्लासिक कार्ड गेम
15. जंक फाईल क्लीनिंग
16. सिंथेटिक झेड
17. फाइल मॅनेजर
18. कम्पोझिट झेड
19. स्क्रीनशॉट कॅप्चर
20. डेली होरोस्कोप वॉल पेपर्स
21. वॉक्सिया रीडर
22. प्लस वेदर
23. एनाइम लाईव्ह वॉलपेपर
24. आय हेल्थ स्टेप काऊंटर
25. कॉम टाइप फिक्शन

Leave a Comment