‘चीनने दिली नव्हती कोरोनाची माहिती’, डब्ल्यूएचओचा गंभीर आरोप

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असतानाच चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याची माहिती दिली नाही व प्रसार रोखण्यासाठी पावले न उचल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. आता डब्ल्यूएचओने चीनवर आरोप करत चीनने नाही तर आपण सर्वात आधी कोरोना व्हायरस संसर्गाच्या पहिल्या टप्प्याची माहिती दिली होती, असे म्हटले आहे.

डब्ल्यूएचओने म्हटले की, वुहान शहरातील निमोनियाच्या प्रकरणाची माहिती चीनने नाही तर सर्वात प्रथम चीनमधील डब्ल्यूएचओ कार्यालयाद्वारे जारी करण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी संघटनेवर आरोप केले होते की महामारी रोखण्यास डब्ल्यूएचओ असमर्थ ठरले आहे व चीनच्या प्रती नरमाईची भूमिका घेतली होती. हे आरोप देखील डब्ल्यूएचओने फेटाळले आहेत.

डब्ल्यूएचओने कोरोना महामारीबाबत 9 एप्रिलला पहिली सूचना टाईमलाईन जारी केली होती. यात संघटनेने म्हटले होते की, हुबेई प्रांतातील वुहान महानगरपालिका आरोग्य संस्थेने 31 डिसेंबरला निमोनियाच्या प्रकरणांची माहिती दिली होती. मात्र ही सुचना चीनच्या अधिकाऱ्यांनी दिली होती की, इतर कोणी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डब्ल्यूएचओने या आठवड्यात जारी सुचनेमध्ये घटनांबाबत माहिती दिली आहे. यातून संकेत मिळतो की चीनमधील डब्ल्यूएचओ कार्यालयानेच 31 डिसेंबरला व्हायरल निमोनियाबाबत माहिती दिली होती. डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रॉस ऐडहॉनम गिब्रियेसस म्हणाले की, चीनकडून पहिला अहवाल 20 एप्रिलला आला होता. हा अहवाल चीनी अधिकाऱ्यांनी पाठवला होता की दुसऱ्या स्त्रोताने याचा उल्लेख देखील नव्हता.

Leave a Comment