अमेरिकेत बॉयकॉट चायनाचे नारे, टाईम्स स्क्वेअरवर चीनविरोधात निदर्शन

चीनच्या आक्रमकता आणि विस्तारवादी धोरणाला आता जगभरात विरोध होताना पाहण्यास मिळत आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरवर भारतीय अमेरिकन, तिबेटियन आणि तायवानच्या नागरिकांनी चीनविरोधात जोरदार निदर्शन केले. यावेळी निदर्शकांजवळ बॉयकॉट चायना आणि स्टॉप चायनीज एब्यूज सारखे पोस्टर देखील होते. दोन दिवसांपुर्वी शिकागोमध्ये देखील चीनविरोधात निदर्शन झाले होते.

ऐतिहासिक टाईम्स स्क्वेअरवर मोठ्या संख्येत भारतीय अमेरिकन्सने चीनच्या विरोधात निदर्शन करत भारत माता की जय व अन्य देशभक्तीचे नारे लावले. चीनचा आर्थिक बहिष्कार करण्याची देखील त्यांनी मागणी केली. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या भारतीय आणि भारतीय नागरिकांची संघटनेच्या (एफआयए) अधिकाऱ्यांनी चीनविरोधात नारे लावले. यावेळी त्यांच्या हातात शहीद जवानांना सलाम करणारे पोस्टर देखील होते.

समुदायाचे नेते प्रेम भंडारी आणि जगदीश सहवानी यांनी या निदर्शनाचे आयोजन केले होते. या निदर्शनात तिबेटियन आणि तायवान समुदायाचे सदस्य देखील सहभागी झाले होते.

Leave a Comment