अक्षय कुमार अडचणीत, नाशिक दौऱ्याची होणार चौकशी

अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपुर्वीच नाशिकचा दौरा केला होता. या दौऱ्या दरम्यान तो नाशिकमध्ये एक दिवस राहिला देखील होता असे सांगितले जात आहे. मात्र आता अक्षय कुमारला हा दौरा महागात पडण्याची शक्यता आहे. अक्षय हेलिकॉप्टरने नाशिकला पोहचला होता. त्यामुळे त्याला लॉकडाऊनमध्ये हेलिकॉप्टरला परवानगी कोणी दिली ? याची आता चौकशी होणार आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अक्षयला परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडची परवानगी, अक्षयसाठी हॉटेल उघडणे व मुख्यमंत्र्यांपासून सर्वजण गाडीने फिरत असताना हेलिकॉप्टरची परवानगी कशी मिळाली ? असा सवाल त्यांना उपस्थित केला आहे.

अक्षयचा हा खाजगी दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. त्याने नाशिकला का भेट दिली होती, याचेही कोणते कारण अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता या दौऱ्यामुळे अक्षय अडचणीत सापडण्याची शक्यता असून, छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment