मोदींनी लाँच केले आत्मनिर्भर भारत अ‍ॅप चॅलेंज, विजेत्याला मिळणार 20 लाखांचे बक्षीस

चीनला उत्तर देण्यासाठी भारत सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. आता सरकारची याबाबत भारताला आत्मनिर्भर बनविण्याची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत आत्मनिर्भर भारत एनोव्हेशन अ‍ॅप चँलेज लाँच केले आहे. मोदींनी लिहिले की, आज मेड इन इंडिया अ‍ॅप्सची निर्मिती करण्यासाठी तंत्रज्ञान आणि स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे. यासाठी @GoI_MeitY आणि @AIMtoInnovate मिळून इनोव्हेशन चॅलेंज लाँच करत आहे.

मोदी म्हणाले की, जर तुमच्याकडे असे उत्पादन आहे व आपणास काहीतरी चांगले करण्याची दृष्टी आणि क्षमता आहे असे वाटत असल्यास टेक समुदायामध्ये सामील व्हा. पंतप्रधानांनी लिंक्डइनवर या चॅलेंजबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड असा या चॅलेंजचा मंत्र असून, या अंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देखील मिळणार आहे. या चॅलेजमध्ये ऑफिस प्रोडक्टिविटी अँड वर्क फ्रॉम, होमसोशल नेटवर्किंग, ई-लर्निंग, इंटरटेनमेंट, हेल्थ अँड वेलनेस, एग्रीटेक आणि फिनटेक, न्यूज आणि गेम्स या कॅटेगरींचा समावेश आहे. अ‍ॅपसाठी काही सब-कॅटेगरी देखील निश्चित करण्यात आल्या आहेत.

या चॅलेंजसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2020 असून, 20-24 जुलै दरम्यान अर्जाची तपासणी केली जाईल यानंतर 7 ऑगस्ट 2020 ला विजेत्याची घोषणा होईल. विजेत्यांना 2 लाखांपासून ते 20 लाख रुपये बक्षीस मिळेल.

Leave a Comment