‘युद्धाभ्यास थांबवा अन्यथा गंभीर परिणाम होतील’, फिलिपाईन्सची चीनला चेतावणी

आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आता चारही बाजूंनी अडकत असल्याचे दिसत आहे. भारतानंतर आता फिलिपाईन्सने चीनला चेतावणी दिली आहे. चीनने विवादित दक्षिण चीन सागरामधील सैन्य अभ्यास सुरूच ठेवल्यास याचे गंभीर परिणाम होतील, असे फिलिपाईन्सने म्हटले आहे. फिलिपाईन्सचे परराष्ट्र सचिव तियोदोरो लोक्सिन ज्यूनियर म्हणाले की, चीनचे पीपुल्स लिबरेशन आर्मी 1 जुलै पासून पेरासेल द्वीपसमूहाच्या बाहेर अभ्यास करत आहे व चीनच्या अधिकाऱ्यांनी सर्व जहाजांना युद्धाभ्यास क्षेत्रात नेव्हिगेट करण्यास बंदी घातली आहे.

चीन जेथे अभ्यास करत आहे, तेथील नो-एंट्री झोनची तपासणी केल्यानंतर लोक्सिन म्हणाले की, पेरासेलवरून येणारे पाणी बंद झाले आहे. याचा व्हिएतनामकडून दावा केला जात आहे. आता फिलिपाईन्सच्या क्षेत्रावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फिलिपाईन्सच्या क्षेत्रात अभ्यास करायला हवा का ? चीनला याचा पुर्वाभास आहे, याची गंभीर प्रतिक्रिया मिळू शकते.

लोक्सिन हे देखील म्हणाले की, चीनला आम्हाला सर्वात जवळील आणि सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून कायम ठेवायचे आहे. कोरोना महामारीनंतर देशातील आर्थिक सुधारणांच्या यशासाठी त्यांची भागीदारी आवश्यक आहे. मात्र त्यांनी तणाव कमी करणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत जबाबदारीचे पालन करावे.

Leave a Comment