शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवला होता मोदींचा लेह दौरा, अजित डोवाल यांनी बनविली रणनिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या निर्णयाने अनेकदा आश्चर्याचा धक्का देत असतात. चीनसोबतच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधानांनी जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी अचानक लेह येथील निमूला भेट दिली होती. पंतप्रधान मोदींच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लडाख दौऱ्यावर जाणार असे सांगितले जात होते. मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. मोदींच्या या भेटीमागील संपूर्ण रणनीती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आखली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्यासह अचानक लेहला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. पंतप्रधान विमानतळावर उतरेपर्यंत त्यांच्या या दौऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. मोदींच्या या दौऱ्याची संपुर्ण तयारी अजित डोवाल,  बिपिन रावत आणि मुकुंद नरवणे यांनी केली होती. आयसोलेशनमध्ये राहून दोन आठवड्यांनी बाहेर आलेले अजित डोवाल हे दिल्लीतच होते.

विशेषज्ञांनुसार, मोदींच्या दौऱ्याने चीनला थेट इशारा दिला आहे. सोबतच जवानांचे मनोबल वाढले व देशातील लोकांना देखील यामुळे विश्वास निर्माण झाला आहे.

लाईव्ह हिंदूस्ताननुसार, पंतप्रधान मोदींच्या लडाख भागातील दौऱ्याचा निर्णय गुरूवारी सायंकाळी घेण्यात आला होता. अजित डोवाल यांनी बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली होती.

Leave a Comment