चीनला मोठा झटका, हिरो सायकलने रद्द केला 900 कोटींचा करार

चीनसोबतच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने प्रत्येक आघाडीवर चीनला धडा शिकवण्याचे ठरवले आहे. आधी सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली, त्यानंतर चीनी कंपन्यांना देण्यात आलेले प्रोजेक्ट देखील सरकारद्वारे रद्द करण्यात आले आहेत. आता हिरो सायकलने देखील मोठा निर्णय घेत चीनसोबतचा 900 कोटी रुपयांचा करार रद्द केला आहे.

हिरा सायकल पुढील 3 महिन्यात चीनसोबत 900 कोटी रुपयांचा व्यापार करार करणार होते. मात्र आता कंपनीने चीनवर बहिष्कार टाकत हा करार रद्द केला आहे. तर दुसरीकडे कंपनीने लुधियानातील सायकल पार्ट्स बनविणाऱ्या छोट्या कंपन्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यांना मर्ज करण्याची ऑफर दिली आहे.

कंपनीचे एमडी पंकज मुंजाल यांनी सांगितले की, हिरो सायकल चीनसोबत दरवर्षी 300 कोटींचे करार करते. त्यांना 3-4 वर्षांचे काँट्रॅक्ट सोबत दिले जाते. यावेळी 900 कोटींची ऑर्डर देण्यात आली होती, मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. या पार्ट्सला आता जर्मनीमध्ये तयार केले जाईल. कोव्हिड-19 च्या काळात जर्मनीत याचे डिझाईन तयार झाले आहेत.

Leave a Comment