सायकलस्वारांवरून चक्क धावत गेली मुलगी, पहा हा भन्नाट व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण हैराण होत आहे. ज्या प्रमाणे लोक घरात, अथवा जिममधील ट्रेडमिलवर चालतात अगदी तसेच एक मुलगी सायकलस्वारांवरून उड्या मारत आहे. 10-12 सायकली अगदी वेगाने जात आहे व मुलगी त्या सायकल चालवणाऱ्यांच्या खाद्यांवर उड्या मारून पुढे पुढे जात आहे.

लोक ज्या प्रमाणे ट्रेडमिलवर धावतात अगदी त्याच साध्या पद्धतीने न घाबरता मुलगी सायकलवर धावताना दिसत आहे. या व्हिडीओला माजी बास्केटबॉलपटू रेक्स चॅपमनने ट्विटरवर शेअर केले आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, लोक नाविन्यपुर्ण आणि अविश्वसनीय असतात.

अवघ्या 5 सेंकदाच्या या व्हिडीओमध्ये मुलगी सहज चालणाऱ्या सायकलवरून उड्या मारताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 35 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी बघितले असून, अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment