मे-2020 सीए परीक्षा रद्द, आता या महिन्यात होणार परीक्षा

इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे 2020 च्या सीए परीक्षेला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षेसोबतच घेतली जाणार आहे. आयसीएआयने सांगितले की, ज्या उमेदवारांनी मे महिन्यातील परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांना अर्ज शुल्क परत आणि सूटसह सर्व लाभ मिळतील.

मे महिन्यात होणाऱ्या सीए परीक्षेला कोरोना व्हायरसमुळे स्थगित करत जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयसीएआयने 29 जूनला सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, 29 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान प्रस्तावित सीए परीक्षेचे आयोजन करण्याविषयी विचार सुरू आहे. मात्र आता ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसोबत पार पडणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी मे 2020 परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांना नोव्हेंबर 2020 मध्ये नव्याने अर्ज करताना आपला ग्रुप आणि परीक्षा केंद्र बदलता येईल. ही परीक्षा 1 नोव्हेंबरपासूनच सुरू होईल. मात्र परीक्षेपुर्वी पुन्हा एकदा स्थिती तपासली जाईल.

Leave a Comment