धक्कादायक! देशातून दरवर्षी गायब होतात 4.6 कोटी मुली

महिला सुरक्षा, महिला सशक्तीकरणाबाबत वर्षांनुवर्ष झाले चर्चा सुरू आहे. सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देखील देते. याशिवाय मुलींना शिकवण्याचा आग्रह देखील केला जात आहे. मात्र असे असले तरी वास्तविक स्थिती वेळी आहे. स्कूपवूपच्या वृत्तानुसार, यूनायटेड नेशन्स पॉप्यूलेशन फंडने (यूएनएफपीए) 2020 स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्यूलेशन रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, दरवर्षी जगभरात 14.2 कोटी आणि भारतात 4.6 कोटी मुली गायब होतात. भारतात लैंगिक भेदभावामुळे मुली गायब होतात.

यूएनएफपीएनुसार, जन्माआधी, लिंग परीक्षणामुळे 3 पैकी 2 मुली गायब होतात. तर जन्मानंतर 3 पैकी एका मुलीचा मृत्यू होतो. गायब झालेल्या 90 टक्के मुली या चीन (50 टक्के) आणि भारतातील (40 टक्के) आहेत. भारताच्या सँपल रजिस्ट्रेशन सिस्टम स्टॅटिस्टिकल रिपोर्ट, 2018 नुसार 2016-2018 चे लिंग प्रमाण 1000 पुरूषांमागे 899 महिला आहे. हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि बिहार या 9 राज्यांमध्ये लिंग प्रमाण 900 पेक्षा कमी आहे.

भारतात केवळ मुलासाठी मुलींची हत्या केली जात नाही. तर भारतात बालविवाह प्रथा देखील पुर्णपणे बंद झालेली नाही. कठोर कायदे असताना देखील नॅशनल हेल्थ अँड फॅमिली सर्वेक्षणाच्या डेटानुसार, 2015-16 मध्ये देशातील प्रत्येकी 4 पैकी एका मुलीचा विवाह वयाची 18 वर्ष पुर्ण होण्याआधी केला जातो.

Leave a Comment