कोण आहे हा विकास दुबे? ज्याच्यामुळे 8 पोलिसांना गमवावा लागला आपला जीव


कानपूर – उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली. विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

2001 मध्ये राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येप्रकरणी गुंड विकास दुबे हा प्रमुख आरोपी आहे. सन 2000 मध्ये, कानपूरच्या शिवली पोलिस स्टेशन परिसरात स्थित ताराचंद इंटर कॉलेजचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडे यांच्या हत्येप्रकरणी विकास दुबे याचेही नाव होते. कानपूरच्या शिवली पोलीस स्टेशन भागात रामबाबू यादव यांच्या 2000 च्या हत्येप्रकरणी विकास दुबे यांच्यावर तुरूंगात कट रचण्याचा आरोप आहे.

2004 मध्ये केबल व्यावसायिका दिनेश दुबे यांच्या हत्येप्रकरणी विकास आरोपी आहे. 2001 मध्ये त्याने कानपूर ग्रामीण भागातील शिवली पोलिस ठाण्यात घुसून निरीक्षक कक्षात बसून तत्कालीन कामगार करार मंडळाचे अध्यक्ष, राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्यावर गोळीबार केला. साक्षीदार नसल्यामुळे या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता झाली.

2001 मध्ये तत्कालीन भाजप राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची पोलिस स्टेशनमध्ये खळबळजनक हत्या केल्याच्या आरोपाखाली एसटीएफ कानपूरने विकास दुबे याला सन 2017 मध्ये लखनऊ येथून अटक केली होती. चौकशीत विकास याने सांगितले होते की 1996 मध्ये हरिकृष्ण श्रीवास्तव आणि संतोष शुक्ला यांनी कानुपरच्या चौबेपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

या निवडणुकीत हरिकृष्ण श्रीवास्तव विजयी झाले. विजयी मिरवणुकी दरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये गंभीर वाद झाला. ज्यामध्ये विकास दुबे याचे नावही आले आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. यावरुनच विकास आणि भाजप नेते संतोष शुक्ला यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्याचमुळे 11 नोव्हेंबर 2001 रोजी विकासने कानपूरच्या शिवली पोलिस ठाण्यात संतोष शुक्ला यांना गोळ्या घालून ठार मारले.

Leave a Comment