ट्विटरवर ‘एडिट’ पाहिजे असेल तर सर्वांना करावे लागेल हे काम

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर एका फीचर असावे की नसावे यावरून अनेकदा दोन वेगवेगळी मते समोर येत असतात. ते म्हणजे ट्विटर एडिट पर्याय. सध्या ट्विटरवर ट्विट एडिट करण्याचा पर्याय नाही. मात्र अनेकांना हा पर्याय हवा आहे. तर अनेक युजर हा पर्याय नसणेच ट्विटरला सर्वोत्तम बनवते असे म्हणतात. एडिट पर्याय नसल्याने ट्विट एडिट करता येत नाही. मात्र आता ट्विटरने आपण एडिट पर्याय आणणार असल्याचे म्हटले आहे. मात्र यासाठी ट्विटरने युजर्ससमोर पुर्ण करण्यास अशक्य असलेली एक अट ठेवली आहे.

ट्विटरने आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून ट्विट केले की, तुम्हाला एडिट बटन मिळेल. मात्र हे बटन तेव्हाच मिळेल जेव्हा सर्वजण मास्क घालतील.

ट्विटरने अनेकदा एडिट बटन देण्यास नकार दिला आहे. आता त्यात ट्विटरने युजर्स समोर अशक्य अशी अट ठेवली आहे. सर्वांनी कोरोना व्हायरस संकटात मास्क घालण्यास जागृक करण्याचा ट्विटरकडून हा छोटासा प्रयत्न होता. ट्विटरने केलेली ही मजेशीर मस्करी नेटकऱ्यांना देखील आवडली.

Leave a Comment