या पठ्ठ्याने घेतला तब्बल 4,000 वर्ष जुन्या पदार्थांचा आस्वाद, ट्विट केली रेसिपी

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरी नवनवीन पदार्थ बनविण्याचा, जेवण बनवणे शिकण्याचा प्रयत्न केला. अनेकांना इतर ठिकाणी अडकल्यामुळे स्वतःच जेवण देखील बनविण्यात आले. काहींनी लॉकडाऊनमध्ये छंद म्हणून जेवण बनवणे शिकले. मात्र एका व्यक्तीने हे खूपच गंभीरतेने घेतले आहे.

लोक पदार्थांवर अनेक वेगवेगळे प्रयोग करत असतात, त्यात नाविन्यपणा आणण्याचा प्रयत्न करतात. जेवणा एवढे प्रयोग दुसरे कशावरच आजपर्यंत झाले नसतील. अशाच एका सोशल मीडिया युजरने तब्बल 4 हजार वर्ष जुन्या रेसिपीचा प्रयोग केला आहे.

ब्रिटनमधील कँब्रिज येथील बिल सदरलँडने देखील लॉकडाऊनमध्ये सर्वांप्रमाणे जेवण बनवले. मात्र फरक एवढाच होता की, त्याने जेवण बनविण्यासाठी जी रेसिपी निवडली, ती जगातील सर्वात जुन्या रेसिपी पैकी एक आहे. 1750 ईसा पुर्व जुनी ही रेसिपी एका खडकावर नोंदवण्यात आलेली आहे.

बिलने 6 पदार्थ बनवून पोस्ट केले. या ट्विटमध्ये एका बाजूला पदार्थ, तर दुसऱ्या बाजूला रेसिपी आहे. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, मी लॉकडाऊनला दोष देतो. मात्र काही कारणांमुळे मी खडकावर नोंदवलेली रेसिपी बनवण्याचा निर्णय घेतला. मेसेपोटामिया पदार्थांचा आस्वाद घेऊन मज्जा आली.

Leave a Comment