लॅम्बोर्गिनीने सादर केली पाण्यावर चालणारी ‘सुपरकार’

लग्झरी कार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनीने पाण्यावर चालणारी सुपरकार लाँच केली आहे. ही एक प्रकारे याच (बोट) आहे. कंपनीच्या हायपरकार सिआन एफकेपी37 पासून ही सुपरकार प्रेरित आहे. या शानदार याचचे नाव ‘Tecnomar for Lamborghini 63’ असे आहे. या बोटची किंमत तब्बल 27 लाख पाउंड म्हणजेच 25.22 कोटी रुपये आहे. याची निर्मिती लॅम्बोर्गिनी आणि याच कंपनी द इटॅलियन सी ग्रुपने केली आहे.

Image Credited – navbharattimes

या याचचे वजन 24 टन असून, जे एका लॅम्बोर्गिनी सुपरकार पेक्षा जवळपास 15 पट अधिक आहे. याची लांबी 60 फूट आहे.  ‘Tecnomar for Lamborghini 63’ याचमध्ये मॅन व्ही-12 इंजिन देण्यात आलेले आहे. जे 4,000 हॉर्सपॉवर जनरेट करते.

Image Credited – navbharattimes

लॅम्बोर्गिनीचा दावा आहे की या याचची टॉप स्पीड ताशी 111 किमी आहे. तर क्रूजिंग स्पीड ताशी 74 किमी आहे. कंपनीने अशा केवळ 63 बोट बनवल्या आहेत. वर्ष 2021 मध्ये याची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

Leave a Comment