सलमानच्या कारकिर्दीवर टांगती तलवार; ७६ टक्के नेटकऱ्यांनी दर्शवली नापसंती


बॉलीवूडचा स्वयंघोषित समीक्षक अभिनेता कमाल आर. खान अर्थात केआरके हा सोशल मीडियात आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. दरम्यान यावेळी त्याच्या रडारावर बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आला आहे. सलमानबाबत बोलताना त्याने सलमानची कारकिर्द आता संपुष्टात आली असून सलमानचे चित्रपट ७५ टक्के प्रेक्षकांना पाहायचे नसल्याचा धक्कादायक दावा केला आहे.


ट्विटरवर कमाल खानने एक प्रश्न विचारला होता. कारकिर्द संपल्यानंतर संपल्यानंतर सलमानला कुठल्या प्लॅटफॉर्मवर पाहायला आवडेल? असा प्रश्न विचारत त्याला वेब सीरिज, टीव्ही मालिका, गाणी, आणि कुठेही नाही असे एकूण चार पर्याय कमालने दिले होते. विशेष म्हणजे कुठेही नाही या पर्यायावर ७६ टक्के नेटकऱ्यांनी आपले मत दिले आहे. याचाच अर्थ असा कि सलमानला त्यांना कुठेही पाहायचे नाही. केआरकेने याच पोलच्या आधारावर सलमानची कारकिर्द आता संपुष्टात आल्याचा दावा केला आहे.

यापूर्वी देखील सलमानवर कमाल खानने निशाणा साधला होता. सलमानचे विकिपिडिया पेज पोस्ट करुन त्याने त्याची खिल्ली उडवली होती. बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून सलमान खान ओळखला जातो. त्याच्यावर आजवर अनेक कायदेशीर खटले देखील दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांचे संदर्भ त्याच्या विकिपिडिया पेजवर देखील पाहायला मिळतात. कमाल खानने या पेजचे काही स्क्रिन शॉट पोस्ट करुन सलमानची खिल्ली उडवली होती. “सल्लूचे हे Wikipedia पेज पाहा याला अभिनेता म्हणावे की….” अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले होते.

Leave a Comment