69 रुपयांमध्ये मोफत कॉल आणि 7 जीबी डेटा, या कंपनीचा धमाकेदार प्लॅन

रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत आहे. नवीन प्लॅन्समध्ये कंपनी युजर्सला जास्तीत जास्त डेटा आणि मोफत कॉलिंगचा फायदा देण्याचा प्रयत्न करत आहे. आता कंपनीने 69 रुपयांचा स्वस्तातला प्लॅन युजर्ससाठी लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमेटेड कॉलिंगसह डेटा देखील मिळत आहे.

69 रुपयांचा प्लॅन –

जिओच्या 69 रुपयांच्या प्लॅनची वैधता 14 दिवस असून, या प्लॅनमध्ये युजर्सला 7 जीबी डेटा, जिओ टू जिओ मोफत कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतील. प्लॅनमध्ये 25 एसएमएस देखील मिळतील. सोबतच युजर्सला जिओ अ‍ॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री स्बस्क्रिप्शन मिळेल.

49 रुपयांचा प्लॅन –

जिओचा हा आणखी एक स्वस्तातला प्लॅन असून, या प्लॅनचा वैधता देखील 14 दिवस आहे. यात युजर्सला 2 जीबी डेटा, जिओ टू जिओ मोफत कॉलिंग, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिटे, 25 एसएमएस मिळतात.

75 रुपयांचा प्लॅन –

या प्लॅनचा कालावधी 28 दिवसांचा असून, यात युजर्सला 3 जीबी डेटा मिळतो. याशिवाय  जिओ टू जिओ मोफत कॉलिंग, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे, 50 एसएमएस मिळतात. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री स्बस्क्रिप्शन मिळेल.

Leave a Comment