झूमला टक्कर देण्यासाठी आले ‘जिओ मीट’

लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. यात झूम हे व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले. आता झूमला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओने जिओ मीट अ‍ॅप लाँच केले आहे. गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरसह या अ‍ॅपला डेस्कटॉप युजर्ससाठी देखील लाँच करण्यात आले आहे. जिओ मीट एचडी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅपद्वारे एकसोबत 100 लोक कनेक्ट होऊ शकतात.

जिओ मीटचे इंटरफेस देखील चांगले आहे. हे काही प्रमाणात झूम प्रमाणेच आहे. जिओ मीट अ‍ॅपमध्ये मल्टी डिव्हाईस लॉगइन सपोर्ट देण्यात आला आहे. एकावेळी 5 डिव्हाईस कनेक्ट करता येतात. कॉलिंग दरम्यान देखील डिव्हाईस बदलू शकता.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंकज पवार म्हणाले, जिओ मीट अनेक खास सेवा देणारा प्लॅटफॉर्म आहे. हे कोणत्याही डिव्हाईस आणि प्लॅटफॉर्मवर काम करते.

Leave a Comment