आश्चर्यच! बाजारात आले ‘पाणीपुरी एटीएम’, सोशल डिस्टेंसिंगचेही होणार पालन

कोरोना व्हायरस महामारीने दैनंदिन आयुष्य पुर्णपणे बदलून टाकले आहे. व्हायरसमुळे बाहेर जाणे बंद आहे. या शिवाय बाहेर जाऊन आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेणे देखील कमी झाले आहे. या काळात अनेकजण दुकानांवर जाऊन पाणीपुरी खाणे मिस करत असतील. तुम्ही देखील अशा लोकांप्रमाणे असाल तर तुमच्यासाठी एक हटके एटीएम आले आहे. या एटीएमद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता तुम्ही पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकता.

मात्र यात एटीएमद्वारे तुम्हाला एक्स्ट्रा पाणी, चटनी मात्र मिळणार नाही. मशीन असल्यामुळे थोडेफार तर नक्कीच सहन करावे लागेल. सोशल मीडियावर या पाणीपुरी एटीएमचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाणीपुरी एटीएम बघून प्रत्येकजण हैराण होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती मशीन कसे काम करते ते सांगत आहे. ही मशीन बनविण्यासाठी 6 महिने लागले त्यात दिसत आहे की आपल्या सर्वसाधारण एटीएम प्रमाणेच ही मशीन आहे. यात पैसे टाकले आणि तुम्हाला काय हवे ते नोंदवल्यावर आपोआप एक-एक पाणीपुरी बाहेर येते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाले. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment