पाकिस्तानात पॅसेंजर रेल्वे आणि मिनी बसची जोरदार धडक, 19 शीख भाविकांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली असून, शेखुपुरा येथे रेल्वे आणि मिनी बसच्या धडकेत कमीत कमी 19 शीख भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे या अपघातात 8 यात्रेकरू जखमी झाले आहेत.

ननकाना साहब जवळील विना फाटक असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. न्यूज18 नुसार, बसमध्ये बहुतांश लोक हे भाविक होते. जे ननकाना साहिबवरून परतत होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेवर दुखः व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे पंजाब प्रांतातील शेखुपुरा जिल्हा पोलीस अधिकारी गाजी सलाहुद्दीन यांनी सांगितले की, ही घटना शेखुपुराच्या फरूकाबाद येथे घडली. कराचीवरून लाहौरला जाणाऱ्या शाह हुसैन एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वे आणि एका बसची धडक झाली.

 

 

Leave a Comment