भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर लडाखजवळील सीमेवर मोदींची सप्राइज व्हिजीट


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर लेहला सप्राइज व्हिजीट दिली आहे. नरेंद्र मोदी कोणतीही पूर्वसूचना न देता लेह येथे पोहोचले आहेत. मोदींनी ही अचानक भेट परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्याचे सांगण्यात येत आहे.


नरेंद्र मोदी या दौऱ्यादरम्यान सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच उपस्थित आहेत.

दरम्यान मोदींनी निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून या परिसारामध्ये नक्की कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिली.

Leave a Comment