मारुती सुझुकीची ‘स्बस्क्राईब’ सेवा लाँच, भाडेकरारावर घेता येणार नवीन कार

मारुती सुझुकीने आपल्या नवीन कार लीज सर्व्हिसची घोषणा केली आहे. या सर्व्हिसला कंपनीने मारुती सुझुकी स्बस्क्राईब नावाने लाँच केले आहे. कंपनीने जपानच्या ऑरिक्स कंपनीसोबत या सेवेसाठी भागीदारी केली आहे. या नवीन सेवेंतर्गत कोणताही ग्राहक मारुती सुझुकीची नवीन कार भाडेपट्टीवर घेऊ शकतात.

कंपनीने यासाठी 24 महिने, 36 महिने आणि 48 महिन्यांपर्यंत भाडेपट्टीचा पर्याय ठेवला आहे. एवढेच नाही तर ग्राहक जर निवडलेल्या कालावधी नंतर देखील कारला भाडेपट्टीवर स्वतःकडे ठेवायचे असल्यास यासाठी कालावधी संपण्याआधी 30 दिवस लिखित स्वरूपात अर्ज द्यावा लागेल.

भाडेपट्टी कालावधीमध्ये ग्राहकाला प्रत्येक महिन्याला निश्चित केलेले शुल्क द्यावे लागेल. यामध्ये कारचे मेंटेनस आणि विम्याचा समावेश असेल. कार भाड्यावर घेण्यासाठी कोणतेही डाउनपेमेंट द्यावे लागणार नाही. कोणत्याही स्बस्क्रिप्शन अथवा लिजिंग सेवेप्रमाणे तुम्हाला यात देखील कार, त्याचे व्हेरिएंट आणि कालावधी निवडावा लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 15 दिवसात निवडलेली कार मिळेल.

जर तुम्हाला निवडलेल्या कालावधीच्या आधीच कार परत करणार असेल तर तुम्हाला इतर बाकी महिने व अतिरिक्त तीन महिन्यांचे शुल्क द्यावे लागेल. या सेवेमध्ये स्विफ्ट, बलेनो, ब्रेझा, सियाज, एक्सएल6 आणि अर्टिगा भाडेपट्टीवर घेऊ शकता. यात सर्व नवीन कार मिळतील. सध्या कंपनीने ही सेवा बंगळुरू आणि गुरुग्राममध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली आहे.

Leave a Comment