रिलायन्स जिओमध्ये आता या कंपनीने केली तब्बल 1894 कोटींची गुंतवणूक

अमेरिकेची आंतरराष्ट्रीय कंपनी इंटेलने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 1894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. मागील तीन महिन्यात रिलायन्स जिओमध्ये विदेशी कंपन्यांद्वारे करण्यात आलेली ही 12वी गुंतवणूक आहे. या आधी फेसबुक, सिल्वर लेक पार्टनर्स, व्हिस्टा, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडाला, सिल्वर लेक, एडिआ, टीपीजी, एल कॅटेरटॉन, पीआयएफ या कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे.

रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्सची हिस्सेदारी विकून तब्बल 117,588.45 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रिलायन्सला आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 25.09 टक्के हिस्सेदारीसाठी गुंतवणूक मिळालेली आहे.

इंटेल कॅपिटलसोबत झालेली गुंतवणूक भागीदारी ही जिओ प्लॅटफॉर्म्सच्या 4.91 लाख कोटी रुपये इक्विटी वॅल्यूवर झाली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या एंटरप्रायजेझ वॅल्यू 5.16 लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. या गुंतवणुकीद्वारे इंटेल कॅपिटलला जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 0.39 टक्के हिस्सेदारी मिळेल.

इंटेल ही टेक्नोलॉजी सेक्टरमधील एक अग्रगण्य कंपनी आहे. इंटेल कॅपिटल क्लाउट कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.

Leave a Comment