‘फेअर अँड लव्हली’चे नाव बदलले, आता या नावाने येणार बाजारात

अमेरिकेसह जगभरात ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ आंदोलनाने जोर पकडल्यानंतर गोरे बनविण्याचा दावा करणाऱ्या अनेक ब्यूटी प्रोडक्ट्सवर टीका होत होती. याच पार्श्वभूमीवर एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान यूनिलिव्हर लिमिटेडने (एचयूएल) आपल्या फेस केअर ब्रँड ‘फेअर अँड लव्हली’मधून ‘फेअर ‘शब्द हटवला आहे. आता हे प्रोडक्ट ‘ग्लो अँड लव्हली’ या नावाने बाजारात येणार आहे.

कंपनीनुसार, त्यांचे ब्रँड ‘ग्लो अँड लव्हली’ या नावाने बाजारात येईल. तर पुरुषांसाठी असलेले उत्पादन ‘ग्लो अँड हँडसम’ नावाने बाजारात येईल. एचयूएलने म्हटले की, पुढील काही माहिन्यात ‘ग्लो अँड लव्हली’ ब्रँड रिटेल दुकानांवर उपलब्ध असेल. कंपनीने या आधी 25 जूनला आपल्या लोकप्रिय स्किनकेअर ब्रँड ‘फेअर अँड लव्हली’ मधून ‘फेअर’ शब्द हटवणार असल्याची घोषणा केली होती.

अमेरिकन हेल्थकेअर आणि एफएमसीजी कंपनी जॉन्सन अँड जॉन्स ने भारतासह  जगभरातील आपल्या स्किन व्हाइटनिंग क्रिमची विक्री थांबवली आहे. फ्रान्सच्या लॉरियल ग्रुपने देखील म्हटले आहे की आपल्या उत्पादनांच्या नावामधून ‘व्हाइट, व्हाइटनिंग, फेअर, फेअरनेस, लाइट, लाइटनिंग’ सारखे शब्द काढणार आहे.

Leave a Comment