कोरोनामुळे फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांचा राजीनामा

फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप (Edouard Philippe) यांनी कोरोना व्हायरसमुळे राजीनामा दिला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारमध्ये ते मागील 3 वर्षांपासून पंतप्रधान होते. फ्रान्समधील कोरोना व्हायरसमुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. फ्रान्समध्ये पंतप्रधानाने 5 वर्षांचा कार्यकाळ पुर्ण होण्याआधी राजीनामा देणे काही नवीन गोष्ट नाही. तेथे अनेकदा असे होते.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एडवर्ड फिलिप यांचा राजीनामा स्विकारला आहे. राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी सांगितले की, पुढील काही तासांमध्ये नवीन पंतप्रधानाच्या नावाची घोषणा केली जाईल. काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे देखील सांगितले जात आहे. मॅक्रॉन पुढील 2 वर्षात आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.

जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळाच्या नावाची घोषणा केली जात नाही, तोपर्यंत फिलिप कार्यभार सांभाळतील.

Leave a Comment