येथे चक्क ड्रोनच्या मदतीने हॉस्पिटलला पोहचवले जात आहेत मास्क

कोरोना व्हायरस महामारीच्या काळात सोशल डिस्टेंसिंग महत्त्वाचे झाले आहे. मानवी संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग महत्त्वाचे आहे. या कामासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जात आहे. आता मानवी संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मॅक्सिकोच्या एका कंपनीने वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी थेट ड्रोन सेवा सुरू केला आहे.

मॅक्सिको सिटीमधील कंपनी सिंक्रोनिया लॉजिस्टिकाने पीपीई किट, मास्क व इतर आवश्यक वस्तू सार्वजनिक हॉस्पिटलला पोहचविण्यासाठी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. पीपीई किटच्या कमतरतेमुळे मॅक्सिकोमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी देशभरात आंदोलन केले होते. मात्र आता ड्रोनच्या मदतीने संसर्गपासून वाचून त्यांना सहज आवश्यक वस्तू मिळतील.

Image Credited – hindustantimes

सिंक्रोनिया लॉजिस्टिकाचे अधिकारी डिएगो ग्रॅसिया म्हणाले की, यामुळे मानवी संपर्काचा धोका तर टळतोच, सोबतच वेळ देखील वाचतो. कंपनीनुसार, ड्रोनचा उपयोग अँटीबॅक्टेरियल जेल, फेसमास्क, हातमोज, 3डी प्रिंटेड फेस शिल्ड्स व कर्मचाऱ्यांसाठी इतर आवश्यक वस्तू पोहचविण्यासाठी होतो.

Leave a Comment