चहा मिळाला नाही म्हणून हॉस्पिटलमधून पळाला कोरोना रुग्ण

चहाप्रेमींसाठी चहा सोडून आणखी काही महत्त्वाचे नसते. चहा पिण्यासाठी ते काहीही करू शकतात. त्यांना चहा हवा असतो म्हणजे असतोच. अशाच एका चहा प्रेमीमुळे मात्र इतरांचा जीव धोक्यात आला आहे. 73 वर्षीय कोरोनाग्रस्ताला चहा मिळाला नाही म्हणून चक्क हॉस्पिटलमधून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कर्नाटकच्या म्हैसुर येथील नगरभावी येथे एका वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर व्यक्तीला म्हैसुर रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आली. सकाळी 5 वाजता चहा प्यावा वाटला. वृद्धाने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडे चहाची मागणी देखील केली. मात्र 8 वाजले तरी रुग्णाला चहा काही मिळाला नाही. चहा न मिळाल्याने रुग्णाने थेट हॉस्पिटलमधून गपचूप बाहेर पडत थेट बाहेरील टपरी गाठली. त्यावेळी तेथील ग्राहकांनी त्याला आताला लावलेल्या विगोबद्दल विचारले असताना, त्याने कोरोनाग्रस्त असल्याचे सांगितले. वृद्धाने असे सांगितल्यावर सर्वच हैराण झाले.

चहाचे दुकान असलेल्या नारायण एलसीने सांगितले की, वृद्धाने सांगितल्यावर सर्व ग्राहकांनी ग्लास खाली ठेवले आणि पळाले. लोकांनी पैसे देखील दिले नाहीत. त्यांना आपले दुकान बंद करावे लागले व त्यानंतर त्यांनी त्वरित हॉस्पिटलला याची माहिती दिली. हॉस्पिटलने त्वरित रुग्णाच्या कुटुंबाला याची माहिती दिली व त्यानंतर रात्री 8 वाजता रुग्णाला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले.

वृद्धाच्या कुटुंबाने हॉस्पिटलवर आरोप केला आहे. लाखो रुपये घेऊन सुद्धा वडिलांना एक कप चहा दिला नाही. हॉस्पिटलने चहा दिला असता, तर त्यांन बाहेर जावे लागले नसते, असे कुटुंबाने म्हटले आहे.

Leave a Comment