थायलंडमध्ये 3 महिन्यांनंतर अशा पद्धतीने सुरू झाल्या शाळा

कोरोना व्हायरसच्या संकटानंतर आता 3-4 महिन्यांनी हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत आहेत. असे असले तरी आंतरराष्ट्रीय विमान सेवा, शाळा-महाविद्यालये इत्यादी सेवा अनेक देशांमध्ये बंद आहेत. भारतात देखील अद्याप शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडमध्ये तीन महिन्यांनंतर शाळा उघडल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने शाळा सुरू झाल्या आहेत, त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

Image Credited – gulfnews

सॅमखोक स्कूल ही थायलंडची राजधानी बँकॉकपासून 50 किमीवर आहे. येथे जवळपा 5 हजार विद्यार्थी शिकतात. शाळेचे मुख्याध्यापक चुचार्ट थेईंथम यांनी सांगितले की, शाळेत येण्याआधीच मुलांना घरात सेल्फ क्वारंटाईन करण्यास सांगण्यात आले होते. याशिवाय विद्यार्थ्यांना केवळ खाजगी वाहनानेच शाळेत येण्याची परवानगी आहे.

Image Credited – gulfnews

त्यांनी सांगितले की, एकदा विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांना मास्क घालणे अनिवार्य आहे. काही एक्टिव्हिटी दरम्यान फेस शिल्ड देखील दिले जाते. मुलांचे तापमान रोज तपासले जाते व याची सर्व माहिती मेसेजद्वारे मुलांच्या पालकांना पाठवतात.

Image Credited – gulfnews

वर्गामध्ये देखील सोशल डिस्टेंसिंगचे पालन व्हावे यासाठी भरपूर सुविधा करण्यात आली आहे. वर्गात कार्डबोर्ड बॅलेट बॉक्स लावण्यात आलेले आहेत. जेवणासाठी देखील विशेष दुभाजक असलेल्या बेंचची सोय केलेली आहे.

Leave a Comment