बॉलिवूडला आणखी एक झटका; प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन


मुंबई : हृदयविकाराच्या झटक्याने बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचे निधन झालं. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. पण त्यांना गुरुवारी मध्यरात्री अत्यवस्थ वाटू लागले आणि उपचार सुरु असताना रात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सरोज खान यांना 20 जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून सुधारणाही झाल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात येत होते. परंतु मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. आज चारकोप येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment