गोवा पर्यटकांसाठी उघडले, हे आहेत नियम

भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेले गोवा आता पुन्हा एकदा पर्यटकांसाठी उघडण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर आता तुम्ही देखील समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गोव्याला भेट देऊ शकता. मात्र यंदा याकाठी कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे.

सरकारने पर्यटकांसाठी काही दिशानिर्देश जारी केले आहे. यानुसार पर्यटकांना आता गोव्यात प्रवेश करण्यासाठी हॉटेलचे प्री-बुकिंग करणे गरजेचे आहे. हॉटेल बुकिंग करताना तुम्हाला तुम्हाला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागेल. याशिवाय गोव्यात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे कोरोनाची लागण नसल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल.

याशिवाय रस्ते, हवाई अथवा जलमार्गाने गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवासांची थर्मल तपासणी केली जाईल. पर्यटकांच्या हॉटेल बुकिंगची कागदपत्रे तपासली जातील. जर तुमच्याकडे डॉक्टरने जारी केलेले कोरोना फ्री प्रमाणपत्र नसल्यास तुम्हाला स्वॅब चाचणी करावी लागेल. गोव्यात झालेल्या चाचणीमध्ये तुम्हाला कोरोनाची लागण असल्याचे आढळल्यास तुम्हाला तेथेच क्वारंटाईन केले जाईल.

देशभरात 25 मार्चला लॉकडाऊन लागू केल्यानंतर गोव्यात देखील पर्यटन बंद होते. मात्र आता आता अनलॉक प्रक्रियेंतर्गत गोवा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी उघडण्यात येत आहे.

Leave a Comment