व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ‘हे’ भन्नाट फीचर्स

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी अनेक शानदार फीचर्स आणले आहेत. यामध्ये अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स, व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी डार्क मोड, क्यूआर कोड्स, काईओएससाठी स्टेट्सचा समावेश आहे. नवीन अपडेटमध्ये कंपनीने ग्रुप कॉलिंगमध्ये देखील सुधारणा केली आहे. हे सर्व फीचर्स आता सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. पुढील काही हफ्त्यात भारतीय युजर्स देखील हे फीचर वापरू शकतील.

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स –

व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सचा वाप युजर्स अनेक दिवसांपासून करत आहेत, मात्र आता अ‍ॅनिमेटेड स्टिकर्सद्वारे चॅटिंग करताना युजर्सला शानदार अनुभव येईल. कंपनीचे म्हणणे आहे की नवीन स्टिकर्समुळे युजर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेबर्सशी अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतील.

क्यूआर कोड्स –

आता युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये क्यूआर कोड्सचे फीचर मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स नवीन कॉन्टॅक्ट्स सहज अ‍ॅड करू शकतील. सेंडरने पाठवलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये जोडू शकतील.

वेबसाठी डार्क मोड –

या वर्षीच्या सुरुवातीला कंपनीने मोबाईल अ‍ॅपसाठी डार्क मोड लाँच केले होते. आता कंपनीने वेब युजर्ससाठी डार्क मोड आणले आहे. लॅपटॉप, डेस्कटॉप वापरणाऱ्यांसाठी हे फीचर उपयोगी ठरेल.

ग्रुप कॉलिंग –

व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपुर्वीच ग्रुप कॉलिंगची संख्या 4 वरून 8 केली. आता कंपनीने व्हिडीओ कॉलिंगला अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रुप कॉलिंग दरम्यान एका युजरला देखील आता फुल स्क्रीनवर पाहता येईल.

KaiOS ला मिळाले स्टेट्स अपडेट फीचर –

कंपनीने KaiOS युजर्ससाठी देखील स्टेट्स फीचर उपलब्ध केले आहे. यामुळे अँड्राईड आणि आयओएस युजर्सप्रमाणे हे युजर देखील स्टेट्स अपडेट करू शकतील.

Leave a Comment