समुद्र किनारी सुरू होते लग्नाचे फोटोशूट, तेवढ्यात आली लाट आणि…

सध्या जगभरात कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. मात्र या काळातही लोक लग्न करत आहेत. लग्न म्हटले की फोटोशूट आलाच. सोशल मीडियावर एका जोडप्याचा असाच लग्नाचे फोटोशूट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या जोडप्याला समुद्र किनारी फोटोशूट करणे मात्र चांगलेच महागात पडले आहे.

या व्हिडीओला एबीसी न्यूजच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहे. त्यांनी लिहिले की, दक्षिण कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनारी एक जोडपे वेडिंग फोटोशूट करत होते. अचानक मोठी लाट आणि दोघांना प्रशांत महासागरात वाहून नेले. मात्र लाईफगार्ड्सने या जोडप्याला वाचवले.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जोडपे खडकावर उभे आहे व फोटोग्राफर फोटो काढत आहे, तेवढ्यात लाट येते व दोघांना वाहून नेते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 5 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी बघितले आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Loading RSS Feed

Leave a Comment