‘धोनीने आणखी 10 वर्ष खेळावे’, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीने महेंद्र सिंग धोनीबद्दल एक खास इच्छा व्यक्त केली आहे. धोनीने पुढील 10 वर्ष क्रिकेट खेळावे असे मायकल हसीने म्हटले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू असलेल्या मायकल हसीने धोनी आणि कोच स्टिफन फ्लेमिंग यांच्या घट्ट संबंधांचे देखील कौतुक केले.

धोनी आणि फ्लेमिंग यांच्याबद्दल हसी म्हणाला की, दोघेही एकमेंकाचा सन्मान करतात. एकमेकांना कॉम्पलिमेंट देतात. दोघांमध्ये एक चांगले नाते आहे. दोघांनाही खेळाची समज आहे. दोघेही स्मार्ट असून, सोबत चांगले काम करतात.

मिस्टर क्रिकेट नावाने प्रसिद्ध असलेला हसी धोनीविषयी म्हणाला की, धोनी नेहमीच आपल्या खेळाडूंचे समर्थन करतो. सोबतच टीमच्या भल्ल्यासाठी अनेकदा अचानक हैराण करणारे निर्णय घेतो. कर्णधार म्हणून धोनी मला खूप आवडतो. तो आपल्या खेळाडूंना पाठिंबा देतो व त्यांच्यावर विश्वास ठेवतो. अनेकदा असे निर्णय घेतो की तुम्हाला समजत नाही, मात्र नंतर तुम्हाला हैराणी होते की कसे हे टीमच्या बाजूने होते.

हसी म्हणाला की, धोनीने आणखी एक दशकभर खेळावे. मात्र नंतर व्यावहारिक होत हसी म्हणाला की, माझी इच्छा आहे की धोनी शक्य आहे तोपर्यंत खेळावे. मला आशा आहे की त्याने पुढील 10 वर्ष खेळावे.

Leave a Comment