सुशांतच्या दाजीने लाँच केला 'नेपोमीटर', नेपोटिझमशी लढण्यास अशी करणार मदत - Majha Paper

सुशांतच्या दाजीने लाँच केला ‘नेपोमीटर’, नेपोटिझमशी लढण्यास अशी करणार मदत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका होऊ लागली आहे. आता सुशांतचे दाजी विशाल कार्तिने नेपोमीटर नावाने एक साईट लाँच केली आहे. चित्रपटामध्ये किती कलाकार, सदस्य हे घराणेशाहीशी संबंधित आहेत, या आधारावर चित्रपटांना रेटिंग दिले जाईल.

विशाल कार्तिने ट्विट केले की, माझा भाऊ मयुरेश कृष्णाद्वारे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत बनविण्यात आले आहे. नेपोमीटरबाबत सोशल मीडियावर सांगण्यात आले आहे की, बॉलिवूड नेपोटिझमसोबत माहितीसह लढा. आम्ही चित्रपटाच्या सदस्यांनुसार रेटिंग करू. चित्रपट किती नेपोटिस्टिक व किती स्वतंत्र आहे सांगू. जर नेपोमीटर अधिक असल्यास बॉलिवूडद्वारे नेपोटिझमवर बहिष्काराची वेळ आहे.

दरम्यान, आलिया भट्टच्या आगामी ‘सडक -2’ या चित्रपटात नेपोमीटरने 98 टक्के नेपोटिझम असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment