आत्महत्येपुर्वी सुशांतने इंटरनेटवर केले होते ‘हे’ सर्च!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत सुशांतशी संबंधित 28 जणांची पोलिसांनी चौकशी केली आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, त्याचे मॅनेजर आणि मित्रांचा समावेश आहे. आता सुशांतचा मोबाईल फॉरेंसिक रिपोर्ट समोर आला आहे. यात त्याने आत्महत्येपुर्वी इंटरनेटवर काय सर्च केले होते, याचा खुलासा झाला आहे.

झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, आत्महत्या करण्यापुर्वी सुशांतने इंटरनेटवर स्वतः बद्दल सर्च केले होते व आपले काही आर्टिकल्स वाचले होते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सुशांतने 14 जूनला सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी गुगलवर आपले नाव सर्च केले होते.

सुशांतचा विसरा रिपोर्ट देखील काही दिवसांपुर्वी समोर आला असून, रिपोर्टमध्ये सुशांतच्या शरीरात कोणतेही रासायनिक अथवा विषारी पदार्थ आढळलेले नाही. दरम्यान, सुशांतचे चाहते त्याची हत्या करण्यात आल्याचे म्हणत आहे व सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

Leave a Comment