कोरोना : घरी जाण्यासाठी या विद्यार्थ्याने चालवली तब्बल 3200 किमी सायकल

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे मागील 3-4 महिन्यापासून लॉकडाऊन आहे. हळूहळू अनेक देशांमध्ये सार्वजनिक वाहतुक सेवा सुरू होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमान सेवा अद्याप बंद आहेत. भारतात देखील लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या मजूरांनी हजारो किमी पायी प्रवास करत घर गाठले. असाच एक विद्यार्थी क्लिऑन पापडीमित्रियोने आपल्या घरी जाण्यासाठी तब्बल 3200 किमी सायकलवरून प्रवास केला.

क्लिऑन स्कॉटलँडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ एबरडीनमध्ये शिकतो. मार्च महिन्यात ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर त्याने आपल्या घरी ग्रीसला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र विमानसेवा बंद असल्याने त्याने उत्तर स्कॉटलँड ते ग्रीसपर्यंतचा प्रवास सायकलने करण्याचा निर्णय घेतला. तो तब्बल 48 दिवस 3200 किमी सायकल चालवून आपल्या घरी पोहचला.

Image Credited – navbharattimes

20 वर्षीय क्लिऑनचे कुटुंब ग्रीसची राजधानी एथेंस येथील मेलेसिया येथे राहते. 10 मे ला त्याने सायकल, एक टेंट आणि थोडेफार खाण्या-पिण्याचे सामान घेऊन आपल्या प्रवासाला सुरूवात केली. या प्रवासात त्याच्याकडे जवळपास 30 किलो वजन होते.

Image Credited – navbharattimes

क्लिऑनने होलांड, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटली असा प्रवास करत ग्रीस गाठले. जवळपास 7 आठवडे प्रवास करून तो आपल्या घरी पोहचला. घरी जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता, म्हणून सायकलने जाण्याचा निर्णय घेतला असे त्याने सांगितले. या प्रवासात क्लिऑन टेंटमध्ये राहिला. ब्रेड, पिनट बटर यावर अवलंबून होता. मात्र घरी पोहचल्यावर क्लिऑनचे धमाकेदार स्वागत झाले.

Leave a Comment