सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी खळबळजनक दावा; Wikipedia ने आत्महत्येपूर्वीच सुशांतला कसे केले मृत घोषित?


मुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी मागच्या महिन्यात गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर सुशांतने नैराश्येमुळे आत्महत्या केल्याची चर्चा सुरु झाली. पण या प्रकरणी आता एक चकित करणारा प्रकार Wikipedia पेजमुळे समोर आला आहे. Wikipedia वर त्याच्या मृत्युच्या आधीच त्याला मृत घोषित केल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.


पोलिसांच्या तपासानुसार सकाळी दहाच्या सुमारास फळांचा रस घेतला होता आणि त्यानंतर दिड तासांनी त्याने आत्महत्या केली. पण यात एक चकित करणारी बाब समोर आली आहे, ती म्हणजे त्याने आत्महत्या करण्याआधी नऊ वाजताच कोणीतरी त्याच्या विकिपिडिया पेज वर त्याचा मृत्यु झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे आता सोशल मीडियाद्वारे पोलिसांना सुशांतचा मृत्यू होणार आहे हे कोणाला माहित होते? हा प्रश्न विचारला जात आहे. सीबीआय मार्फत सुशांतच्या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केली अशी चर्चा होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment