कोरोना : प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी या आहेत अटी

देशभरात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णांवर उपचार करण्यासाटी प्लाझ्मा दान करण्यास सांगितले जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीची मदत घेतली जात आहे. महाराष्ट्र सरकारने देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा ट्रायल सुरू केले आहे. या पाठोपाठ आता दिल्ली सरकारने देखील देशातील पहिली प्लाझ्मा डोनेशन बँक उघडली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनामुक्त झालेली व्यक्ती 14 दिवसांनी रक्त देऊ शकते. मात्र असे असले तरी देखील प्लाझ्मा दान करण्यासाठी काही अटी आहेत. या अटी काय आहेत जाणून घेऊया.

कोणती व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करू शकत नाही ?

  • ज्या व्यक्तीचे वजन 50 किलोंपेक्षा कमी आहे.
  • ज्या महिला कधी गर्भवती होत्या किंवा आता आहेत.
  • मधुमेहाचे रुग्ण जे सध्या इंसुलिन घेत आहेत.
  • ज्या व्यक्तीचे ब्लड प्रेशर 140 पेक्षा अधिक असेल.
  • ज्या रुग्णाला मोठ्या प्रमाणात मधुमेह अथवा हायपरटेंशन असेल.
  • कॅन्सरमधून बरी झालेली व्यक्ती.
  • ज्यांना मूत्रपिंड/हृदय/फुफ्फुस किंवा यकृताचा आधी आजार आहे.
  • 18 पेक्षा कमी आणि 60 पेक्षा अधिक वय असलेले डोनेट करू शकत नाहीत.
  • ज्या लोकांची प्रकृती ठीक नाही.

वरील अटींमध्ये येणारी व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करू शकत नाही. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमधील प्लाझ्मा डोनेट करणाऱ्यांची संख्या कमी होते.

Loading RSS Feed

Leave a Comment