ज्या चीन कनेक्शन अ‍ॅपला भारताने केले नाही बॅन, त्यावर आता पाकिस्तानने घातली बंदी

पाकिस्तानने लोकप्रिय ऑनलाईन बॅटल गेम ‘प्लेयर अननोन बॅटलग्राउंड’वर अर्थात पबजी गेमवर अस्थायी बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या टेलिकम्यूनिकेशन अथॉरिटी पीटीएने पबजी गेम युजर्ससाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे. पीटीएने सांगितले की, त्यांना या गेमबाबत वारंवार तक्रारी येत होत्या.

पाकिस्तानने पबजीवर अस्थायी बंदी घातल्याने कंपनीला मोठा झटका बसला आहे. गेमबाबत पाकिस्तानच्या टेलिकम्यूनिकेशन अथॉरिटीने सांगितले की, ही गेम व्यसन लावते, वेळ वाया घातवते आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर नकारात्मक परिणाम टाकते. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आत्महत्येसाठी पबजी गेमला जबाबदार धरले आहे.

पीटीएने सांगितले की, लाहोर उच्च न्यायालयाने देखील निर्देश देत प्रकरणावर लक्ष देण्यास सांगितले आहे. यावर 9 जुलै 2020 रोजी सुनावणी होणार आहे. पाकिस्तानमध्ये 24 जूनला पबजी गेममुळे 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती.

दरम्यान, पबजी एक सरवाइवल गेम असून, याला 2017 साली दक्षिण कोरियाच्या कंपनीद्वारे विकसित करण्यात आले आहे. मात्र दक्षिण कोरियाच्या पबजी कॉर्पोरेशनमध्ये चीनी कंपनी टेंसेंटची भागीदारी आहे. या कंपनीनेच पबजीचे मोबाईल व्हर्जन पबजी मोबाईल तयार केले आहे. त्यामुळे या गेमच्या मोबाईल अ‍ॅपला चीनी अ‍ॅप म्हटले जाते.

Leave a Comment