रेल्वेचे खाजगीकरण, 109 मार्गांवर खाजगी कंपन्या चालवणार पॅसेंजर ट्रेन

भारतीय रेल्वेने आता पॅसेंजर ट्रेन सर्व्हिस ऑपरेट करण्यासाठी खाजगी कंपन्यांसाठी दरवाजे उघडले आहेत. देशातील 109 मार्गांवर खाजगी कंपन्या 151 पॅसेंजर ट्रेनचे संचालन करतील. यासाठी जवळपास 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीची शक्यता आहे. देशभरातील रेल्वे नेटवर्कला 12 क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. याच 12 क्लस्टरमध्ये 109 खाजगी मार्गावर रेल्वे चालवल्या जातील. या रेल्वे चालविण्यासाठी सरकारने खाजगी कंपन्यांकडे अर्ज मागवले आहेत.

पॅसेंजर ट्रेन संचालनासाठी पहिल्यांदाच भारतीय रेल्वेने खाजगी गुंतवणूकदारांसाठी रस्ता वेगळा केला आहे. देशातील 109 स्थानांसाठी चालवल्या जाणाऱ्या सर्व रेल्वेमध्ये कमीत कमी 16 कोच असतील. या रेल्वेंचा टॉप स्पीड ताशी 160 किमी असेल.

भारतीय रेल्वेचा हा प्रोजेक्ट 35 वर्षांसाठी आहे. खाजगी कंपन्यांना एनर्जी आणि हॉलेज शुल्क वापरानुसार द्यावे लागणार आहे. या सर्व ट्रेन भारतीय रेल्वेचे ड्राइव्हर आणि गार्ड ऑपरेट करतील. मेक इन इंडिया अंतर्गत बहुतांश गाड्या भारतात तयार केल्या जातील. वाहनांना वित्तपुरवठा करणे, खरेदी करणे, ऑपरेट करणे आणि देखरेखीसाठी खासगी संस्था जबाबदार असेल.

Leave a Comment