सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी सरकारवर येऊ शकते कर्ज काढण्याची वेळ - Majha Paper

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी सरकारवर येऊ शकते कर्ज काढण्याची वेळ


पुणे – पुण्यात आज पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महसूलात घट झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही सध्या सरकारसाठी अवघड बनले असल्यामुळे त्यांचा पगार पुढील महिन्यात देणेही कठीण होईल, त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे.

यावेळी वडेट्टीवार पुढे म्हणाले की, सरकारच्या महसूलात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे घट झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर्ज काढावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे. पण डॉक्टर, नर्स आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या कोरोना योद्ध्यांचे पगार वेळेत दिले जातील अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

Leave a Comment