या वर्षी यूएई अथवा श्रीलंकेत होऊ शकतो आयपीएल ?

कोरोना व्हायरसमुळे यंदाचे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र आता या वर्षी आयपीएलच्या 13व्या सीझनचे आयोजन यूएई अथवा श्रीलंकेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टी-20 विश्वचषकाचा अंतिम निर्णय आल्यानंतर बीसीसीआय आयपीएल बाबत घोषणा करू शकते. टी-20 विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये निश्चित करण्यात आले होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे याबाबत अनिश्चितता आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतातच आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बोर्ड अखेर यूएई अथवा श्रीलंकमध्ये स्पर्धेचे आयोजन करू शकते.

अधिकाऱ्याने सांगितले की, स्पर्धा कोठे होईल हे अद्याप ठरवलेले नाही. मात्र या गोष्टीची पुर्ण शक्यता आहे की आयपीएल यंदा परदेशात होऊ शकते. भारतात सध्या अशी स्थिती नाही की एक अथवा दोन ठिकाणी सामने खेळवले जावेत अथवा खेळाडू आणि सर्वसामान्यांसाठी सुरक्षित स्थिती नाही. मात्र सामने रिकाम्या स्टेडियममध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत यूएई आणि श्रीलंका सर्वात पुढे आहेत. लवकरच यावर निर्णय घेतला जाईल.

Leave a Comment