मला सुद्धा या घराणेशाहीमुळे गमवावे लागले अनेक चित्रपट – तापसी पन्नू


बॉलिवूडमधील आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये आपली वेगळीच इमेज बनवणारी अभिनेत्री तापसी पन्नूला सुद्धा घराणेशाहीला सामोरे जावे लागले होते. याबद्दलचा खुलासा खुद्द तापसीने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करत बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील भाष्य केले.

हिंदीसुष्टीत तुम्ही जर स्टार किड असाल किंवा तुम्हाला फिल्मी बॅकग्राऊंड आणि जर गॉडफादर असेल तर तुम्हाला जास्त झगडावे लागत नाही. याउलट बाहेरुन आलेल्यांना फार मेहनत घ्यावी लागते, ओळखी बनवाव्या लागतात. अनेकदा दिग्दर्शक त्यांच्या ओळखीच्या कलाकारांनाच काम देऊ इच्छितात. अशा वेळी बाहेरून आलेल्यांना संधी मिळत नसल्याचे तापसीने म्हटले आहे.

तसेच बाहेरुन आलेल्या प्रत्येक कलाकाराने हे समजून घ्यावे की आपल्याला या क्षेत्रात थोडा वेळ लागेल, पण तुमच्याकडे प्रतिभा आणि कौशल्य असले की तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यावेळी मिळालेले यश हे फक्त तुमचेच असेल. त्यावर कोणाचाच अधिकार नसेल. स्टार किड्सपेक्षा बाहेरुन आलेले कलाकार प्रेक्षकांनाही आवडतात. त्याचबरोबर बॉलीवूडमधील या घराणेशाहीमुळे आपण देखील अनेक चित्रपट गमावल्याचा खुलासा तापसीने यावेळी केला.

Leave a Comment