खरच ‘सूर्यवंशी’च्या श्रेयनामावलीतून करण जोहरचे हटवले का नाव? जाणून घ्या सत्य


अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पण त्याच निमित्ताने बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्मात-दिग्दर्शक करण जोहर यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीकेचा भडीमार केला जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येपासून करण सतत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच आता करण जोहरचे अक्षय कुमारच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातून नाव हटविल्याची चर्चा होती. पण याबद्दलची सत्य परिस्थिती प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन सांगितली आहे.


करण जोहर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची निर्मिती करत असून त्याला सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी ट्रोल केले आहे. म्हणूनच करण जोहरचे नाव या चित्रपटाच्या श्रेयनामावलीतून हटविल्याची चर्चा सुरु होती. पण या चर्चांमध्ये काही तथ्य नसून चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्याचे नाव असल्याचे तरण आदर्श यांनी सांगितले आहे.

करण जोहरचे नाव ”सूर्यवंशी’च्या श्रेयनामावलीतून हटविल्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत. त्या चुकीच्या असून याविषयी रिलायन्स एन्टरेन्मेंटकडून खुलासादेखील करण्यात आल्याचे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे. दरम्यान, करण जोहर, सलमान खान यांच्यावर सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी घराणेशाहीचा आरोप केला आहे. त्याचबरोबर करण जोहरवर दिवंगत अभिनेता इंदर कुमार याच्या पत्नीने देखील घराणेशाहीचा आरोप केला आहे.

Leave a Comment